चोरांवर दोन दगड पडले तर ….; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर राऊतांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्यां यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केल्यानंतर पुन्हा एकदा सोमय्या विरुद्ध शिवसेना हा सामना रंगला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या हल्ल्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

INS Vikrant निधीचा अपहार करणारा आरोपी.. बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? Ins vikrant घोटाळा  देशद्रोह आहे! जय महाराष्ट्र असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

नेमकं काय घडलं-
किरीट सोमय्या काल नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिस स्टेशन मध्ये भेटायला गेले होते. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांचा गाडीवर दगड फेकला. यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या हनुवटीवर रक्त दिसत होते. या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या जखमी अवस्थेत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले. जोपर्यंत या शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत गाडीतून उतरणार नाही अशी भूमिका सोमय्यानी घेतली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध सोमय्या हा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

Leave a Comment