हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत सेफ जागेवरून निवडणूक लढवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिल्यानंतर संजय राऊत यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या दुखत्या नसीवर बोट ठेवले. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरूड ला आला तर आम्ही काय बोललो का असा टोला राऊतांनी लगावला.
“मी काय कराव हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे…”, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांतदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला.माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणारच… आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार”, असं संजय राऊत म्हणाले. “तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले… आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू… तुम्ही तुमच बघा”, असं म्हणत संजत राऊत यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले-
जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.