हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे मोघम उत्तर दिले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात कारण परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या तिखट भाषेतील टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
राज ठाकरे नक्की काय म्हणाले होते –
एका मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांना याबाबत विचारले होते की तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं होत. तसेच मी परमेश्वराला मानतो असेही राज ठाकरे म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.