महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार – संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला पूर्णविराम बसला आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात होती.परंतु संजय राऊत यांनी या सर्व शक्यतेणा आता पूर्णविराम दिला आहे. तसेच निवडणुका कधी घ्यायच्या हे निवडणूक आयुक्त ठरवतात, चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणूक आयोगाने एखादी जबाबदारी दिली असेल तर माहित नाही, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलाना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजप मधील महत्त्वाचे नेते आहेत. आणि त्यांच्याकडे ज्या अर्थाने बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.  त्यावरून राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचं कार्य वाढत आहे. राज्यापुढे अनेक प्रश्न असतात, अशावेळी राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे, असा हा संवाद होता, या भेटीनंतर कुणीही नाराज होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मी नक्की घेणार आहे. मी यापूर्वी पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. तसेच मी राहुल गांधी आणि अमित शहा यांनाही मुलाखती साठी विनंती करणार आहे असेही संजय राऊत म्हणाले.

बिहार निवडणुकीबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. बिहारमध्ये शिवसेना कायम काही जागा लढवत असते, तेथील शिवसेना उमेदवारांना चांगला प्रतिसाद उमेदवारांचा मिळत असेल, तर ते योग्य आहे, कारण अनेक कार्य़कर्ते वर्षानुवर्ष तेथे शिवसेनेसाठी काम करतायत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’