मास्क का वापरू नये याच स्पष्टीकरण राज ठाकरेंनी द्यावे; संजय राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना काही सवाल केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरें मनसे पक्षाचे नेते आहेत पण मास्क का वापरत नाहीत याचं त्यांनी ठोस विश्लेषण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ते सुद्धा कलाकार आहेत, जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. मास्क का वापरू नये याच त्यांनी स्पष्टीकरण द्यावे अस संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्याचा आरोग्य या विषयावर चांगला अभ्यास आहे. या विषयांवर त्यांना बरचंस कळतं. जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. देशाचे पंतप्रधान, विविध मंत्री, मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहे. मास्क हीच खरी लस आहे आणि त्यात तथ्य देखील आहे, असंही राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like