अजित पवार बारामतीत सायकलीवरून फिरायचे, शरद पवारांनी त्यांना मोठं केलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती येथील एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल काय महित असं म्हंटल होते. अजित पवारांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. अजित पवार बारामतीत सायकल वरून फिरायचे.. शरद पवारांनी त्यांनी मोठं आहे. त्याच पवार साहेबांबद्दल (Sharad Pawar) अशी वक्तव्य करणं योग्य नाही असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, अजित पवार लांडग्यांच्या कळपात गेले आहेत. शरद पवारांशी आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण तुम्ही आज जे काही आहात. तुम्ही जे सुखाचे चार घास खात आहात ते पवारांमुळे…. अजित पवार तु्म्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवर फिरत होतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. जर शरद पवारांनी एवढं मोठं सम्राज्य उभं केलं नसतं तर तुम्ही कुठे असता? आज तुम्ही जे काही आहात ते फक्त शरद पवारांमुळे आहात…. आम्ही जे काही आहोत ते फक्त शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहोत असेही राऊतांनी म्हंटल.

यापूर्वी जितेंद्र आव्हाडांचाही अजित पवारांवर निशाणा –

अजित पवारांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही काल सडकून टीका केली होती. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे.आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वी पासून बघितले आहे. आता तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते” अशी तिखट टीका अजित पवारांवर आव्हाडांनी केली. “तुम्ही एखाद्या माणसाच्या मृत्यूची इच्छा करणे कितपत योग्य आहे. तुम्ही तर काकाच्या मृत्यूची वाट पाहताय. शरद पवार कायम अजरामर असतील. त्यांचे योग्यदान पण अजरामर असेल. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहताय, तुम्ही आज हद्द ओलांडली आहे. काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असा इशाराही आव्हाडांनी दिला होता.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

बारामती येथील आपल्या भाषणात अजित पवारांनी म्हंटल, आजपर्यंत तुम्ही आपल्या वरिष्ठांचे ऐकलं.. आता माझं ऐका… आपले वरिष्ठ म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे. भावनिक करतील.. पण त्यांची शेवटची निवडणूक कधी येतेय हे माहिती नाही. त्यामुळे विकासाकडे बघून मतदान करा आणि लोकसभेला मी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभं रहा.