तुम्ही खरे हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे, जिनांवर गोळी झाडली असती – संजय राऊत

SANJAY RAUT
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तुम्ही जर खरे हिंदुत्त्ववादी होता आणि तुमच्यात जर मर्दांनगी होती तर महात्मा गांधी नव्हे तर जिनांना गोळी घातली असती असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नथुराम गोडसे आणि भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

जिनाने पाकिस्तानची मागणी केली होती. देशाची फाळणी त्यांनीच घडवून आणली होती . ज्यांनी पाकिस्तानची मागणी केली त्यांना गोळी घालायला हवी होती. तुमच्यात हिंमत होती तर गांधींना नव्हे तर जिनांना गोळी घालायला हवी होती. एका फकिराला गोळी मारणं योग्य नव्हत असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, महात्मा गांधींच्या  भूमिकेवर आम्हीही टीका केली. पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि कार्य मोठं आहे. बलाढ्य ब्रिटिश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं आहे. गांधींचं नेतृत्व धैर्यशील आणि असामान्य आहे. गांधीजींना गोळी झाडण्यात आली. पण गांधी मेले नाहीत असे राऊतांनी म्हंटल.