किसनवीर कारखान्यात नक्कीच परिवर्तन होणार : शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

“किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज तेथील सभासदांना हातात घेतली असून त्यांना परिवर्तन हवे आहे. आपला ऊस गेला पाहिजे, त्याला भाव चांगला मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही नक्कीच परिवर्तन करू, असा विश्वास माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राजेश पाटील-वाठारकर, सत्यजित पाटणकर, जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील यांची उपस्थिती होती.

कराड दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आज कमकूवत असली तरी भविष्य काळामध्ये मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथील कार्यकर्त्यांना चांगले बळ देऊन कराड दक्षिणेत राष्ट्रवादी मजबूत करू, असा विश्वास माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या समाजाची टिंगल करत नाही

खर तर राज्य करणाऱ्यांना विकास कामावर बोलण्याची आज गरज आहे. पण राज्यात सध्या आरे ला कारे करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या समाजाची टिंगल करते असं म्हणणं योग्य होणार नाही. पण दुर्दैवाने आज राजकारणाची पातळी घसरत असून ती हिताची नाही.

आगामी निवडणूक ‘मविआ’च्या माध्यमातून लढणार

राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याची चर्चा सुरू आहे. त्या तशाच लढल्या जातील असा विश्वास आहे. दुर्दैवाने त्यात काही अपयश आले, तर स्वतंत्रपणे पक्ष निवडणूक लढवतील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment