हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लि पसोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी एका कार्यकर्त्यांशी बोलताना गुवाहाटी मध्ये सगळं ओके असून काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल अस म्हंटल होत. शहाजीबापूंच्या या ऑडिओ क्लिपवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, तिथे कोणीतरी आमदार म्हणतोय की, काय झाडी आहे, काय हॉटेल आहे, काय पाणी आहे. मग महाराष्ट्रात काय स्मशान आहे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी केला. तुम्ही या ना इथे. तुमचा महाराष्ट्र आहे. तिथेही झाडी आहे, फूल आहे, निसर्ग आहे, दगडं आहेत, पाणी आहे. मग महाराष्ट्रात काय आहे तुमच्या?” असेही राऊत म्हणाले.
काय आहे प्रकरण-
सांगोलयाचे आमदार शहाजी पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्यांशी फोन वर केलेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी गुवाहाटी मधील राहणीमानाचे वर्णन करताना काय झाडी, काय डोंगर काय हॉटेल अस म्हणत इथं सगळं ओके आहे म्हंटल आहे. त्यावरून शहाजी पाटील ट्रोल झाले आहेत.