ज्यांनी बाळासाहेबांना जिवंतपणी यातना दिल्या तेच आता…; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

0
72
raut raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा काढून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत ज्यांनी बाळासाहेबांना जिवंतपणी यातना दिल्या तेच आता त्यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत असा टोला लगावला.

संजय राऊत पुणे दौऱ्यावर असताना हडपसर येथील एका जाहीर सभेत त्यांनी मनसे आणि भाजपवर जोरदार टीका केली. 15 वर्षात त्यांना भोंग्याच्या त्रास झाला नाही. या कालावधीत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, येवडच नव्हे तर लाडके फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भोंग्याच्या त्रास झाला नाही. पण आता स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री झाले की यांना भोंग्याचा त्रास झाला अस राऊत म्हणाले.

शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपकडून सुपाऱ्या दिल्या जातात. महाराष्ट्रातील सरकारला त्रास देण्यासाठी भाड्याची माणसे घेतात. त्याच्या अंगावर भगवी शाल टाकतात. पण शिवसैनिकाच्या खांद्यावर जो भगवा आहे तो खरा ओरिजिनल आहे अस म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here