“महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर…,” राऊतांचा राज्यपालांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी राऊत म्हणाले की, राज्यपालांनी राज्य सरकारची अडवणूक करु नये. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असते मात्र, या ठिकाणी पाय खेचण्याचे प्रकार केले जात आहेत. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल हे लक्षात ठेवावे.

राज्यपालांकडून सत्तेची २ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने केलेल्या कामाचे ते उदघाटन करतात सरकारला न विचारता राज्यपाल त्यांचा कार्यक्रम जाहीर करतात असं म्हणत महाविकास आघाडीने राज्यपालांच्या दौर्यावर आक्षेप घेतला आहे.

Leave a Comment