जब खोने के लिए कुछ भी न बचा हो, तो…; संजय राऊतांचे सूचक ट्वीट

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला बंडखोर आमदारांमुळे उतरती कळा लागली आहे. अशात विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला असल्याने त्याच्याकडून धनुष्यबाण चिन्ह घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. यावर राऊत यांनी आज ट्विट केले आहे. “जब ‘खोने’ के लिए कुछ भी ना बचा हो तो ‘पाने’ के लिए बहुत कुछ होता है! जय महाराष्ट्र!” असे ट्विटमध्ये राऊतांनी म्हंटले आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थिती व धनुष्यबाण चिन्हाच्या मुद्यावरून शिवसेनेने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. “जब ‘खोने’ के लिए कुछ भी ना बचा हो तो ‘पाने’ के लिए बहुत कुछ होता है! जय महाराष्ट्र!” असे ट्वीट राऊतांनी केलं आहे. जय महाराष्ट्र !.

आत्तापर्यंत शिवसेनेचे एकमात्र चिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचे ठामपणे म्हंटले जात होते. मात्र, आता त्या चिन्हांवरही शिंदे गटाने दावा दाखवलेला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पक्ष कार्यकर्त्यांना “नव्या चिन्हाची तयारी ठेवा”, असे आवाहन केले आहे.