हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना नेते संजय राऊत हे आपल्या बेधडक वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतात. त्याचे ट्विट देखील चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारने नुकतेच अनलॉकची नियमावली घोषित केली आहे. येत्या ७ जून पासून ती नियमावली लागू करण्यात येणार आहे. मात्र अनलॉक संदर्भात काढलेली अधिसूचना इंग्रजी भाषेत आहे. ही अधिसूचना मराठीतून का नाही ? याबाबत सवाल केला गेला आहे यावरूनच राऊत यांनी केलेलं रिट्विट सध्या चर्चेत आहे.
सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर त्यांना बडवणार
मराठी मराठी करत मतंही मागणार
पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच
संपूर्ण कोरोना काळात हे कायम घडत आलंय
सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही? https://t.co/7YuOemLcmd
— Prashant Kadam (@_prashantkadam) June 5, 2021
नक्की काय आहे ट्विट
“सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर त्यांना बडवणार… मराठी मराठी करत मतंही मागणार… पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच… संपूर्ण कोरोना काळात हे कायम घडत आलंय… सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?” अशा आशयाचे ट्विट एबीपी माझाचे पत्रकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. मात्र संजय राऊत यांनी त्यांचे हेच ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याच सरकारला संजय राऊत यांनी चिमटे काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.