इम्तियाज जलील निजामाची अवलाद; संजय शिरसाठ यांची जोरदार टीका

imtiyaz jaleel sanjay shirsat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर MIM ने याला तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. परंतु यावेळी काही आंदोलनकर्त्यानी चक्क औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने नव्या वादाला तोंड फुटले.याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जलील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इम्तियाज जलील ही निजामाची अवलाद आहे असं म्हणत त्यांनी चांगलंच तोंडससुख घेतलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाठ म्हणाले, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झालयामुळे एमआयएमला आनंद होणारच नाही. कारण ही निजामाची अवलाद आहे. ओवेसी आणि इम्तियाज जलील हे हैद्राबादचे पार्सल आहेत. त्यांना या शहरात त्याचे वंशज ठेवायचे आहेत. म्हणून त्या औरंगजेबाचा फोटो संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा झळकताना दिसला. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करायला हवी होती मात्र त्यांनी ती केली नाही. परंतु आम्ही आणि संभाजीनगरची जनता हे सहन करणार नाही असं शिरसाठ म्हणाले.

संभाजीनगर मध्ये नेमकं घडलं काय ?

औरंगाबादच्या नामकरणविरोधात एमआयएम कडून काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्यात आलं. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा उपस्थित होते. मात्र यावेळी एक तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन उपोषणाच्या ठिकाणी आला. त्यानंतर औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या. औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत याठिकाणी जल्लोष सुरु झाला. मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह उपोषणास्थळून बाहेर काढून लावले. मात्र या सर्व प्रकाराने नव्या वादाला तोंड फुटलं.

यांनतर इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की आपण या गोष्टीचे समर्थन करत नाही. कोणीतरी औरंगजेबचा फोटो घेऊन आलं होत पण आम्ही त्याला लगेच बाहेर काढलं. मला माहिती आहे की, कोणीतरी तो फोटो घेऊन इथे पाठवला आहे. परंतु मी त्या समर्थन करत नाही. आमचं आंदोलन फेल जाण्यासाठी कोणीतरी हा प्रकार केला आहे असं जलील यांनी म्हंटल.