Wednesday, March 29, 2023

संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा चावलाय; शिंदे गटाची जहरी टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला बसून यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही अशी टीका त्यांनी केल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा लावलाय अशा शब्दात त्यांनी राऊतांवर घणाघात केलाय.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिरसाठ म्हणाले, संजय राऊतांना पुन्हा एकदा पिसाळलेला कुत्रा चावलाय, त्यांनी आधी स्वतःचे घर सांभाळावे. ३ महिने आराम करून आला तरी अकलेचे तारे कशाला तोडता असं म्हणत संजय शिरसाठ यांनी राऊतांवर घणाघात केला आहे . संजय राऊत राज्यसभेला आमच्या पाया पडत होते, आम्हीच त्यांना मतदान केलं आहे. गेली २५ वर्ष आम्ही जनतेतून निवडून येतोय पण संजय राऊत कधी लोकांमधून निवडून आलेले नाहीत असेही शिरसाठ म्हणाले.

- Advertisement -

दुसरीकडे, शिंदे गटातील दुसरे आमदार संजय गायकवाड यांनीही राऊतांवर तोंडसुख घेतलं आहे. आमच्यावर गद्दारीचा आरोप लागणार नाही तर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्याना असणार आहे त्यामुळे राऊतांनी अशी भाषा वापरू नये. आम्ही निवडणुकीत पडू किंवा जिंकू हे जनता ठरवेल. भविष्यात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुम्ही तुमचा पक्ष किती भुईसपाट केला ते कळेलच असा इशाराही त्यांनी दिला.