जेव्हा सगळे देशावर प्रेम करायला लागतील तेव्हा …., सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरात संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाच्या समारोप प्रसंगी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे वक्तव्य केले. ज्यादिवशी सगळे देशावर प्रेम करायला लागतील त्या दिवशी संघ नावाची पट्टी निघून जाईल, असे वक्तव्य मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी यावेळी केले.

काय म्हणाले मोहन भागवत?
भारताला सर्वश्रेष्ठ मानून त्यासारख बनण्यासाठी, भारताच्या वैभवासाठी, भारत समजून भारत सारख होण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. हे संघाच काम नाही तर सर्वांचे काम आहे. सर्वांनी करावे यासाठी संघ नाव घेऊन हे काम केले जात आहे. ज्यादिवशी सगळे देशावर प्रेम करायला लागतील त्या दिवशी संघ नावाची पट्टी निघून जाईल, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे.

संघ हे नाव महत्त्वाचं नाही
संघाला नाव रोशन करायचे नाही तर समाज घडवायचा आहे. भारताला आत्त्मनिर्भर बनवायचे असेल तर नक्कल करून होणार नाही.. त्यासाठी भारत बनवावा लागेल. भारत समजावा लागेल, असेदेखील मोहन भागवत (Mohan Bhagwat) यावेळी म्हणाले. संघासाठी सर्वात आधी भारताला प्राधान्य आहे. जो व्यक्ती भारतासाठी काम करतो, तो आमचा आहे. भारताच्या मार्गात जो आडवा येतो, तो आमचा नाही, असेसुद्धा मोहन भागवत म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट