राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्याप्रकरणी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं’ ; संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राम मंदिर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता या घोटाळ्याबाबत राजकीय नेत्याकडूनही टीका टिप्पणी होतू लागली आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घोटाळ्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले असून त्यांनी थेट ‘आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच प्रश्न विचारला आहे. “राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे. या प्रकरणी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं’,” अशी मागणी राऊत यांनी सोमवारी मुंबई येथे केली आहे.

सोमवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिली. त्यामध्ये राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केले आहेत. सिह यांच्या आरोपानंतर या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी याबाबत खुलासा करावा तसेच याप्रकरणी उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.

वास्तविक पाहता सिह यांनी केलेले आरोप हे अतिशय धक्क्कादायक असे आहेत. अयोध्येच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो तमाम हिंदूंच्या श्रद्धेला विषय आहे. सर्वसामान्यांनी आपल्या घराघरातून मंदिराच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा केलेली आहे. आता या निधीचा अशा प्रकारे गैरवापर होणार असेल तर हिंदूंच्या श्रद्धेला काही अर्थच उरणार नाही, अस राऊत यांनी म्हंटल आहे.

Leave a Comment