‘कश्मिर कि कली’ झाली महाराष्ट्राची सुनबाई ; मराठमोळे अजित पाटील झाले काश्मीरचे जावई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कश्मिर चे 370 कलम हटवलेचा फायदा मराठी पट्ठयाला झाला असुन महाराष्ट्राचे सोयरिक कश्मिर बरोबर जुळले मराठमोळा अजित पाटील कश्मिरचा जावई झाला. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणार्या कराडच्या अजित पाटील यानी कश्मिरी युवती बरोबर विवाह केला. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील हा युवक भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन Instructor या पदावर झांसी येथे कार्यरत आहे याच ठिकाणी अजित पाटील सोबत काम करणाऱ्या कश्मिर मधील सहकारी मित्राकडे पाहुणी म्हणुन आलेल्या जम्मू कश्मिर मधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगत या युवतीची भेट ,तोंड ओळख झाली प्रथम भेटीतच दोन्ही कडुन प्रेमाचे अंकुर फुटले होते दोघांच्या घरातुन ही याला संमती होती. मात्र ही प्रेमकाहणी लग्नात रुपांतर करणेसाठी मोठा अडथळा होता 370 कलमाचा यामुळे अजित आणि सुमन देवी काही महिने निराश होते.

भारत सरकारने 370 कलम हटवताच अजित सुमनच्या एकत्र आयुष्य घालविण्याच्या आशा पल्लवित झाल्या. मार्च 2020 मध्ये सुमनच्या नातेवाईक सहकार्याबरोबर 10 दिवसाच्या सुट्टी वर जम्मु कश्मिर ला अजित पाटील गेले होते कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहिर झाल्याने तब्बल तीन महिने काशमिर मध्ये सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहवे लागले याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले सुमन देवी यांच्या घरच्यांना अजित यांना जवळुन समजुन घेता आले आणि सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली.

अजित यांचा 27 नोव्हेंबर 2020 रोजी मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या उपस्थितीत जम्मू कश्मिर मधील किस्तवाड येथे कश्मिरी पध्दतीने लग्नगाठ बांधली गेली तर चार दिवसांपुर्वी कराडमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली. सरकारने जर 370 कलम हटवले नसते तर आम्ही लग्न करु शकलो नसतो 370 कलम हटवलेचा सर्वात जास्त फायदा मला झाला असुन माझेसाठीच कलम हटवले असल्याची भावना अजित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment