व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकांत पाटलांवरील सव्वा रुपयाच्या दाव्याच्या प्रश्नावर उदयनराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्र पाठवून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले. त्यावर राऊतांनीही त्याला प्रत्युत्तर देत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आज सातारा येथे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचासरला असता त्यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. प्रश्न विचारणाऱ्याचाच त्यांनी बुके देऊन सत्कार केला.

राज्यात भाजप व शिवसेना या दोनी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यात सध्या टोलेबाजी सुरु आहे. त्याबाबत तदोन्ही पक्षातील नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया दिल्या जाताहेत. दरम्यान आज सातारा येथे भाजभाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर खासदारराऊतांनी दावा ठोकण्याच्या केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांबाबत मुलाखत सुरु असताना एका पत्रकाराने उदयनराजेंना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “तुम्ही अत्यंत संयमाने मला साथ दिलीत, त्याबद्दल माझ्या वतीने आपल्या सर्वांना हा पुष्पगुच्छ” असे म्हणत आपल्या गाडीतील बुके काढून पत्रकाराला देत त्याचा सत्कार केला. खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या अनेक हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आज प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधीच्या केलेल्या सत्काराची चर्चा चांगलीच रंगली आहे.