सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे 340 रुग्ण संख्या झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात आठ ओमिक्रॉन रुग्ण होते. मात्र, आज सातारा शहरात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्णांचा अहवाल हा ओमिक्रोन पॉझिटिव्ह असा आलेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होता आहे. दरम्यान नव्या ओमिक्रॉनची व्हेरियंटचे रुग्णही सातारा जिल्ह्यात आढळल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता सातारा शहरात आणखी दोन ओमिक्रॉनचे रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. आता सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 340 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 7. 26 टक्के आला आहे. कोरोना सोबत ओमिक्राॅनचे प्रमाण वाढलेले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाबरोबर ओमिक्रॉन बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे राहताना दिसत आहे. कोरोना चाचणी बरोबर बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.