सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याचे समाजत आहे. संध्याकाळी ८ वाजता जिल्ह्यातील कराड, पाटण आणि खटाव तालुक्यात ४ कोरोना बाधित सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा आणखी १६ कोरोनाग्रस्तांचे सापडले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
रात्री उशिराने सापडलेले कोरोनाबाधित कोरेगाव 2, खटाव 1, पाटण 2, कराड 3, वाई 1 आणि सातारा ११ असे आहेत. त्यापूर्वी संध्याकाळी ८ वाजता सापडलेले रुग्ण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे आहेत. सद्यस्थितीत साताऱ्यात ९१ रुग्णावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०१ वर पोहोचली आहे. तसेच आत्तापर्यंत जिल्ह्यातील 106 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर चौघांचा मृत्यू झाला आहे.