सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या घरफोडीच्या चोरीच्या गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस प्रशासनास यश आले आहे. आज पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6 लाख 31 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांब्या पितळेची भांडी, 49 सिलेंडर व गुन्हयात वापरलेले वाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हस्तगत करण्यास यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे एक तपास पथक तयार करुन त्यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. दि २७ मे रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना आरोपी १) जीवन शहाजी रावते रा. दत्तनगर कोडोली सातारा, २) अमर बापूसाहेब देवगुडे रा. खोकडवाडी कोडोली सातारा, ३) महेश अंकुश देशमुख रा. हरपळवाडी ता. कराड जि. सातारा, ४) विजय आत्माराम रिटे रा. व्यंकटपुरापेठ सातारा यांनी सुमारे १० महिन्यापुर्वी अतित ता. जि. सातारा येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून सिलेंडरच्या टाक्या चोरी केलेल्या आहेत.
प्राप्त माहितीच्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे तपास पथकास नमुद आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. संबंधित तपास पथकाने नमुद आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे प्राप्त माहितीच्या अनुशंगाने कौशल्यपुर्वक व सखोल विचारपुस केली. त्यांनी सुमारे १० महिन्यापूर्वी अतित ता. जि. सातारा येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून ३५ सिलेंडरच्या टाक्या व पुसेगाव येथून १४ सिलेंडरच्या टाक्या चोरी केल्या असल्याचे सांगीतल्याने २ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून १ लाख १ हजार ५०० रुपये किमतीचे ४९ सिलेंडर व गुन्हयात वारलेले २ लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत करण्यात आलेले आहेत.
तसेच पोलीस कोठडी मुदतीत विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकाने नमुद आरोपींच्याकडे अधिक कौशल्यपुर्वक व सखोल विचारपुस केली असता त्यांनी कोंडवे ता. जि. सातारा, पिंगळी ता.माण जि. सातारा, महिमानगड ता. जि. सातारा, धामणी ता. पाटण जि. सातारा येथे घरफोडया केल्या असल्याचे सांगितल्याने नमुद आरोपींच्याकडून नमुद गुन्हयात चोरीस गेलेले ३ लाख ३० हजार १०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांबा पितळेची भांडी हस्तगत करण्यात आलेली आहेत. संबंधित आरोपींच्याकडून एकूण ७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एकूण ६ लाख ३१ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांब्या पितळेची भांडी, ४९ सिलेंडर व गुन्हयात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आलेले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर सातारा यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, रविंद्र तेलतुंबडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, नंगेश महाडीक, मोहन नाचण, दिपाली यादव, अंजती लोखंडे, मुनीर मुल्ला, अमोल माने, राकेश खांडके, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रविण कांबळे, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, धीरज महाडीक, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, प्रकाश वाघ यांनी सदरची कारवाई केलेली आहे.