व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

डीजी कॉलेजवर राडा : दोन महाविद्यालयीन युवकांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील धनंजय गाडगीळ महाविद्यालयीन युवकांच्यात किरकोळ कारणावरून आज मोठा राडा झाला. महाविद्यालयात बाहेरील काही गँगस्टारांनी हा राडा केला. यामध्ये दोन महाविद्यालयीन युवकांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले आहेत.

डीजी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या दोन युवकांवर बाहेरील अज्ञात व्यक्तीने येऊन मारहाण केली. या मारहाणीत दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. कॉलेज परिसरात पोलिसांच्या गस्तीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र या प्रकरणावरून दिसून येत आहे. वारंवार अशा प्रकारचे राडे होत आहेत. गेल्या काही महिन्यात कॉलेज परिसरात चाकू घेऊन मारहाण करत एक गिफ्ट शॉपी फोडण्यात आली होती.

या परिसरात काही अंतरावरच निर्भया पथकाची चौकी आहे. तरीही पोलिसांचा धाक कमी झाला आहे, नक्की पोलीस पथक काय करत आहे. काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अचानक येऊन कॉलेज परिसरात भेट दिली होती. तरीही पोलीस अशा फळकूट दादांच्यावर वचक ठेवण्यात अपयशी कसे ठरतात, यांचाही विचार करणे गरजेचे आहे.