सातारा जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान जिल्हयात संपुर्ण लाॅकडाउन राहणार आहे. १७ जुलै ते २२ जुलै जिल्ह्यात १००%  लाॅकडाऊन लागले आहे.

लॉकडाउन काळात जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
शुक्रवारी मध्यरात्री पासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर परिसरातही सदरील आदेश लागू होणार आहे. संचारबंदीच्या काळात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

या गोष्टी राहणार संपूर्णतः बंद

1) सर्व किराणामाल दुकाने, ठोक विक्रेते, इतर व्यवसाय
2) उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स
3) वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारू यांची दुकाने २२ तारखेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तर २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहणार आहे.
4) ZOMETO, SWIGGY आदी पोर्टलवरून मागवण्यात येणारे खाद्यपदार्थसेवा २२ तारखेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तर २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहणार आहे.
5) सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बंद राहतील. तसेच मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
6) सर्व केशकर्तनालये, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत.
7) जिल्ह्यातील सर्व भाजी मार्केट, आठवडी बाजार २२ तारखेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तर २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार आहेत.
8) सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच सर्व शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहणार आहेत.
9) मटण, चिकन, अंडी यांची विक्रीही बंद राहणार आहे.
10) सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, दोन चाकी, चार चाकी, तीन चाकी संपूर्णतः बंद राहतील.
11) बांधकाम व कंस्ट्रक्शन कामे बंद राहतील.
12) धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील.
13) अमेझॉन, फ्लिपकार्ट यांची सेवा बंद राहील.

या गोष्टी राहणार सुरु

1) दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी ६ ते १० यावेळेत
2) सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा नियमित वेळापत्रकानुसार
3) सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडित सेवा ( कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचे कारण देऊन रुग्णांना नाकारू शकत नाही अन्यथा कारवाई होणार)
4) सर्व मिडिकल दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सूर राहणार
5) सर्व न्यायालये व शासकीय कार्यालये
6) पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी
रेशन दुकान
7) वृत्तपत्रे, नियतकालिके, डिजिटल तसेच प्रिंट मेडिया यांची कार्यालये
8) बँक, सहकारी बँक, गावांतील सोसायट्या, एलआयसी कार्यालये सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहणार
9) कृषी सेवा केंद्र, बी बियाणे, कीटकनाशके यांची दुकाने सुरु राहणार
10) तसेच खाजगी जागेत चालू असलेली सर्व औद्योगिक आस्थापने चालू राहतील

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here