साताऱ्याच्या लेकीने अखेर करून दाखवलं!! ना क्लास, ना अकॅडमी तरीही UPSC मध्ये देशात 560 वा क्रमांक

pratiksha kadam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPSC परीक्षा पास होऊन आयएएस, आयपीएस होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. अनेकजण यासाठी दिल्लीला जातात. परंतु सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा संजय कदम हिनं घरीच अभ्यास करून UPSC परीक्षेत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ना क्लास, ना कोणती अकॅडमी तरीही फक्त आपला अभ्यास, जिद्द आणि मेहनत या जोरावर प्रतिक्षा यूपीएससी परीक्षेत देशात ५६० वी आली आहे.

सातारा जिल्ह्यातील वळसे येथील प्रतीक्षा संजय कदम ही एका शेतकरी कुटुंबातील आहे. तिने लोणेरे, (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये ई अ‍ॅण्ड टीसीमधून बीटेक पदवी घेतली आहे. प्रतिक्षाने यापूर्वी २ वेळा यूपीएससी साठी प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही वेळेस तिला यशाने हुलकावणी दिली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात हे यश तिला मिळाले. सध्या आयपीएसपर्यंत पोहचली असली तरी भविष्यात आयएएससाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिक्षाने सांगितले.

यापूर्वी प्रतिक्षाने २०१९ मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यावेळी तिला यश मिळालं नाही. त्यानंतर २०२० मध्ये तिने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी फक्त ०.७९ मार्कांनी तिला यशाने हुलकावणी दिली. अखेर जिद्द, चिकाटी आणि मेहनत या जोरावर तिने तिसऱ्या प्रयत्नात दमदार मोठं यश मिळवले. विशेष म्हणजे कोणताही क्लास आणि ऍकेडेमी न लावता प्रतिक्षाने मिळवलेल्या या यशाने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.