सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारा हिल हाफ मॅरेथॉन आयोजकांच्यावतीने ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2021’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज रविवारी दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली.
या स्पर्धेत 1 हजार 500 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेत लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. दरवर्षी या स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग असतो. मात्र, ओमीक्रोनमुळे परदेशी स्पर्धकाविना ही स्पर्धा पार पडली.
सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, इथोपिया या देशाचे स्पर्धक प्रथम क्रमांक पटकावतात. मात्र, आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोनमुळे यंदा विदेशी धावपट्टूना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.