घड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला ! सातार्‍यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, सातार्‍यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यावर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घड्याळासमोरील बटन दाबले. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या तिथल्या निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घड्याळाला मतदान केले तरी ते कमळाला जात असल्याचं मान्य केल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यानंतर सदर ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/445764886054352/