सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भात कापणी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांचे शेतीवर प्रेम कायमच आहे. त्यांच्या शेतात सध्या भाताचे चांगले पीक आले आहे. या कामात त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी मदत केली. सर्व कुटुंबीयांचे फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत.
श्रीनिवास पाटील यांच्या गोटे कराड येथील शेतात उत्तम आले आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांच्या काढणीला गती आली आहे. पिकांच्या काढणीला कामात शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र आहे. खा. पाटील हे देखील आपल्या कुटुंबियांसमवेत शेती कामासाठी वेळ देत आहेत. त्यांच्या शेतात भात कापणीला सुरुवात केली. या कामासाठी त्यांच्या पत्नी सौ रजनीदेवी पाटील, पुत्र सारंग पाटील, सून सौ. रचना पाटील तसेच नातू अंशुमन व अनुसया यांनी देखील या कामासाठी मदत केली.
श्रीनिवास पाटील हे मूळचे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतीची मोठी आवड आहे. प्रशासकीय अधिकारी ते उच्च पदावर विराजमान होऊन देखील ते आपल्या परंपरेशी एकरूप राहिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’