सातारा । सातारा- मेढा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात जेसीबी 100 फूट खोलदरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात जेसीबी चालक अक्षय कदम यांनी जेसीबीतून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी ते बेशुद्ध पडले. त्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी त्यांना सातारा येथील रुग्णालयात दाखल केलं.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी दुपारच्या सुमारास एक जेसीबी केळघर घाटातून चालला होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी खोल दरीत कोसळला. जवळपास 100 फूट खोल दरीत जेसीबी कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जीव वाचवण्याच्या प्रयत्नात चालक अक्षय कदम बेशुध्द पडल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.
त्यांनतर अपघातातील जखमी चालकास तात्काळ सर्जेराव खुटेकर, सुनील खुटेकर, विठ्ठल खुटेकर, प्रकाश खुटेकर, स्वप्नील खुटेकर, विकास खुटेकर, विशाल खुटेकर, ऋषिकेश खुटेकर, राहुल खुटेकर, जगन खुटेकर, रमेश खुटेकर यांनी मदत केली. तसेच 108 नंबरवर फोन लावून रूग्णवाहिका बोलावून उपचारासाठी साताऱ्यात हलविले.