सातारा जिल्हा हादरला! जमिनीच्या वादातून जावयाकडून सासऱ्याचा गोळ्या झाडून खून

satara news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरेगाव (Satara News) | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात जमिनीच्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. वाघोली (ता. कोरेगाव) येथे जावयाने चुलत सासऱ्यावर गोळीबार केला असून या घटनेत सासरा सुनील शंकर भोईटे (वय- 48) याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने सातारा जिल्हा हादरला असून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे. सदरचा दावा सुनील भोईटे यांनी दाखल केलेला आहे, अशीही माहिती मिळत आहे. यावरून नामदेव भोईटे यांचे जावई आणि सुनील भोईटे यांच्यात वादविवाद झाले होते. आज सायंकाळी सात वाजणेचे सुमारास नामदेव याचे जावई रवी यादव व सुनिल यादव या दोघांनी वाघोली येथे सुनील भोईटे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे निघाले असताना त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले. Satara News

त्यावेळी भोईटे यांचा मुलगा माझ्या वडिलांना मारू नका म्हणुन हात जोडून विनवण्या करीत होता. मात्र तरीही रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात व छातीत तीन गोळ्या घातल्या. गोळ्या वर्मी लागल्याने सुनील भोईटे यांना तातडीने पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच भोईटे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंपोडे येथील रुग्णालयात लोकांनी मोठी गर्दी केली होती.

संशयित रवी यादव व सुनिल यादव (मुळ रा. सोळशी ता.कोरेगाव) हे सध्या पुणे येथे वास्तव्यास असतात. गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोघेही स्वतःहून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेसंदर्भात वाठार पोलीस अधिक तपास करीत आहेत.