आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : बंडातात्या कराडकरांची सातारा पोलिसांकडून चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच याचा अहवाल 48 तासाच्या आत आयोगास सादर करावा, अशी मागणी केली होती.

राज्य महिला आयोगाच्या मागणीनुसार सातारा पोलिसांनी आज सकाळी सातारा येथील कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी करण्यास सुवात केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांविरोधात काल गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.