सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यास सुरूवात झालेली आहे. पोवई नाका येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांच्या वंशजांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. तसेच पुतळा परिसर आकर्षक असा सजविण्यात आला आहे.
साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वृषालीराजे शिवाजीराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती कौस्तुभआदित्यराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी पोवई नाक्यावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
शिवजयंती निमित्त लावण्यात आलेल्या भगव्या पताकांनी शिवतीर्थ अवघा भगवामय दिसत आहे. महिला आणि युवतींचा मोठ्या प्रमाणात शिवजयंतीला सहभाग दिसून येत आहे. नऊवारी साडी नेसून डोक्यावर फेटा परिधान करून शिवजयंती साजरी करताना युवती दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.