चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ-