Wednesday, February 8, 2023

सातारचे पब्लिक सोबत आहे बस्स झालं म्हणत छ. उदयनराजे भोसले यांचा पालिकेत स्वबळाचा सूचक इशारा

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी

सातारा शहरातील विकासकामे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेवून करणार का? असे विचारले असता सातारचे पब्लिक आहे सोबत मग बस्स झालं, असे म्हणत खा. छ. उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा सूचक इशारा दिला. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र येण्याच्या शक्यता सध्यातरी धूसर असलेच्या वारंवार दिसून येत आहे.

- Advertisement -

साताऱ्यात आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील रस्त्यांच्या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पोवई नाक्यावरील शिवस्मारकाच्या अर्धवट कामाची खासदार उदयनराजेंनी पाहणी केली. बंद असलेल्या कामाची गती वाढवण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

खा. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, निवडणूक आल्याने विकासकामांचा धडाका लावलेला नसून जेव्हा निधी उपलब्ध होतो. तेव्हाच विकासकामे हाती घेतली जातात. या अगोदर अनेक विकासाची कामे सातारा शहरात झालेली आहेत. तेव्हा निवडणुका नव्हत्या, आणि निवडणुका पुढे आहेत म्हणून विकासकामे करायची नाहीत का? यापुढे सर्वांना बरोबर घेवून विकासकामे केली जातील.

मला कोरोना झाला होता का नाही हे माहित नाही

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज साताऱ्यात माध्यमांना दिली. आपल्याला कोराना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला उदयनराजे यांनी लगावला.