हातगोळे व स्फोटक बारूद जप्त प्रकरणात ३ अटकेत; दुचाकीसह ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा प्रतिनिधी । प्रादेशिक वनविभागाने सातपुड्यातील जूनी वसाडी येथील शिकार्‍याच्या घरावर १० फेब्रुवारीला छापा मारला होता. यावेळी वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ७३ हातगोळे व स्फोटक बारूद जप्त करून कालू तेरसिंग अहिर्‍या यास अटक केली होती. या आरोपीने तपासात दिलेल्या जबाबावरून बाकी फरार असलेले ३ आरोपी बदा डुडवा हजरसिंग अमरसिंग चंगळ, दवसिंग अनारसिंग डूडवा रा. शिवाजीनगर जूनी वसाली यांना अटक केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांनी वनपथकासह १८ फेब्रुवारी रोजी कारवाईत सदर तीन आरोपींना अटक केली. चौकशी दरम्यान वन गुन्ह्यात वापरलेलय २ मोटर सायकली, जाळे (वागरूड) भाला, कुर्‍हाड मुद्देमाल ४८ हजार रूपये जप्त केला. आज संग्रामपूर न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना जमीन मिळाला. सातपुड्यात वनविभागाने केलेल्या या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.