लवकरच मी पूर्णसत्य सांगणार; सत्यजित तांबेंचा इशारा नेमका कोणाला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणूक जाहीर झाल्यांनतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचे आपण बघितले. त्यामुळे सुरुवातीपासून ही निवडणूक चर्चेचा विषय ठरला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानांतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होत. मात्र आज या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी आज मतदान केल्यानंतर मोठं विधान केलं आहे. जे सत्य आहे ते योग्य वेळ आली की सांगेल असं त्यांनी म्हंटल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, मी खरं तर कॉग्रेसचा फॉर्म भरला होता मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म भरू शकलो नसल्याने मला अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. काँग्रेसमधील काही लोकांकडून आमच्या परिवारावर आरोप करण्यात आले. नाना पटोले यांनी जे काही सांगितलं ते अर्धसत्य आहे. लवकरच योग्य वेळ आली की पूर्णसत्य सांगेल असं म्हणत त्यांनी इशारा दिला.

दरम्यान, मला 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मला मिळाला आहे. माझा विजय निश्चित झालाच आहे फक्त आता लिड किती मिळत त्याकडे लक्ष आहे असं म्हणत मी अपक्ष आहे आणि अपक्षच राहीन असेही सत्यजित तांबे यांनी सांगितलं.