पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी पाटण नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. या ठिकाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का सहन करावा लागला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजित पाटणकर यांनीविजय उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर “पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही,” अशी टीका करीत सत्यजित पाटणकर यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याच्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजित पाटणकर यांनी विजयानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पाटण या ठिकाणी आमचे जे पारंपरिक विरोधक आहेत. सध्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्हाला पराभूत करण्यासाठी अनेक भूलथापा जनतेत केल्या. अनेक विकास एकमे मंजूर करून आणली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि पाटण नगर पंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यास राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. या ठिकाणी 17 जागासाठी 63 उमेदवार रिंगणात होते. याही वेळेस पाटणच्या जनतेने पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीला पाठींबा दिला.
सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायत निवडणूक हि राष्ट्रवादी काँग्रेस नेते विक्रमसिह पाटणकर आणि शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याच्यासाठी प्रतिष्टेची मानली जात होती. पाटण नगरपंचायत निवडणुकीत 15 जागावरती राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाला व शिवसेना पक्षाला या ठिकाणी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/342987960777492
पाटणकर गटाने पहिल्या 12 प्रभागात विजयी सलामी दिली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आस्मा सादिक इनामदार यांनी 202 मते मिळवून विजय संपादन केला आहे तर शबाना इम्रान मुकादम यांना 167 मते मिळाली आहेत. याच मित्राबरोबर हिराबाई मारुती कदम आणि श्रद्धा संजय कवर यांचाही या ठिकाणी पराभव झाला आहे.