कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सध्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर यांच्या गटात लढत होत आहे. या निवडणुकीत विजय नक्की कोणाचा होणार हे दि. 20 एप्रिल नंतर स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिह पाटणकर यांनी विकत केला आहे.
सत्यजितसिह पाटणकर यांनी पाटण येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनुषंगाने महत्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, पाटण बाजार समितीची निवडणूक सुरू झाली आहे. हि निवडणूक प्रथेप्रमाणे याहीवेळी विक्रमसिंह पाटणकर यांच्याच विचारांची राहील. बाजार समितीच्या निवडणुकीबाबतचे खरे चित्र दि. 20 रोजीनंतर स्पष्ट होईल.
https://www.facebook.com/watch/?v=1960578920960661&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing
तरीही आम्ही आमच्या विचारांचे अर्ज भरले असून ही निवडणूक आम्हीच लढवून जिंकून दाखवणार आहोत. पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती हि आमच्याकडेच येणार याची आम्हाला 100 टक्के खात्री आहे. कारण ही बाजार समिती माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांच्या विचारांनीच राहील यात शंका नाही, असे सत्यजितसिह पाटणकर यांनी म्हंटले आहे.