टीम हॅलो महाराष्ट्र । मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात अनेक नव्या गोष्टी पहायला मिळत आहेत. या अधिवेशनात राज ठाकरे आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. त्याचे प्रतिबिंब मनसेच्या या अधिवेशन कार्यक्रमात दिसत आहे. मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यात आली. मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा दिसून आल्यानं राज ठाकरे उजव वळण घेत हिंदुत्वाच्या वाटेवर आपली राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान आज मनसेचा झेंडाही बदलण्यात आला आहे. हा नवीन झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा आहे. त्यापूर्वी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. दरम्यान आज संध्याकाळी राज ठाकरे या राज्यव्यापी अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणारा आहेत. त्यामुळं मनसेची पुढची राजकीय भूमिका काय असणार या प्रश्नाचं उत्तर राज यांच्या भाषणानंतरच समजणार आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?
मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण; नव्या झेंड्यावर शिवमुद्राचं
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…