नवी दिल्ली । कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताने जनआंदोलन उभे केले आहे असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोनाचे संकट जेव्हा भारतात आले तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभा राहिला आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नवा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे असंदेखील पंतप्रधान मोदीनी म्हटले आहे. या परिषदेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. भारताने जनतेला कोरोनाच्या लढाईशी जोडले. प्रत्येकजण करोनाशी लढा देतो आहे. आपल्या देशावर आलेले संकट परतवून लावायचे आहे हा निर्धार देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला आहे एवढेच नाही तर अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आम्ही आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरु केली आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अन्न सुरक्षा योजनेचाही उल्लेख केला.
Our motto is 'Sabka Saath, Sabka Vikaas, Sabka Vishwas' – meaning 'Together, for everyone's growth, with everyone's trust'. This resonates with the core SDG principle of leaving no one behind: PM Narendra Modi pic.twitter.com/JouFBTOJvm
— ANI (@ANI) July 17, 2020
संयुक्त राष्ट्राच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअल सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी भारताने नैसर्गिक संकटांशी केलेला सामना, करोनाविरोधातली लढाई, गरीबांसाठी राबवलेल्या योजना आणि आत्मनिर्भर भारत या मुद्यांवर भाषण केले. एएनआय ने यासंदर्भात ट्विट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”