SBI | आजकाल पैशाबाबत मोठमोठे फ्रॉड व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होत आहे. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना सावधानतेच्या इशारा दिलेला आहे. बँकेकडून येणाऱ्या फ्रॉड फोन आणि एसएमएसपासून सावध राहण्यास एसबीआय बँकेने सांगितलेले आहे. बँकेने( SBI) एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या काही बनावट लिंकवर क्लिक करण्यास आणि फाइल्स डाऊनलोड करण्यास बँकेने मनाई देखील केलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की, सायबर गुन्हेगार एसबीआय रिवार्ड पॉईंट्स रिडीम करण्यासाठी ग्राहकांना एसएमएस आणि व्हाट्सअप मेसेजमध्ये बनावट लिंक पाठवत आहे. ज्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.
रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याचा सेफ मार्ग | SBI
एसबीआय त्यांच्या ग्राहकांना लॉयल्टी प्रोग्राममध्ये तर रोज जे काही व्यवहार होतात त्यासाठी काही रिवॉर्ड पॉइंट देत असते. बँकेने दिलेल्या प्रत्येक रिवॉर्ड पॉईंटचे मूल्य हे 25 पैसे एवढे असते. एसबीआयच्या नुसार एसबीआय रिवॉर्ड प्रोग्रॅमसाठी ग्राहकांची आपोआप नोंद केली जाते. आता ही नोंदी करण्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सगळ्यात आधी तुम्ही कम्प्युटरच्या स्मार्टफोनवर अधिकृत वेबसाईट चालू करा.
- त्यानंतर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर तुमचा एसबीआय रिपोर्ट कस्टमर आयडी इंटर करा.
- त्यानंतर नोंदणी करत मोबाईल क्रमांकवर तुम्हाला ओटीपी येईल.
- आता तुमचे सगळे पेपर व्हेरिफाय करा.
- या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही पॉईंट रीडिम करणे सुरू करू शकता.
ऑफलाइन पद्धतीने एसबीआय कार्ड रिपोर्ट कसे रीडिम करायचे | SBI
तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअर नंबर वर कॉल करून देखील ही क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट ऑफलाइन पद्धतीने रीडिम करू शकता. त्यानंतर कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही संपूर्णपणे पॉईंट्समध्ये पैसे देऊ शकता.