SBI Customers Alert : ग्राहकांनी वेळीच सावध व्हा, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SBI Customers Alert (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत जगणे खूपच सुसह्य झाले आहे . प्रत्येक व्यवहार आपण मोबाईलच्या एका क्लीकवर हाताळत आहोत, पण हाच सुसह्यपणा आपल्याला कधी कधी धोकादायकही ठरू शकतो .अगदी आर्थिक व्यवहाराच्या रूपातही आपणाला दगा होऊ शकतो ह्याचा प्रत्येय देणारी एक बातमी आम्ही इथे देत आहोत ज्यायोगे सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन फसवणुकीपासून तुम्ही आपले आर्थिक नुकसान होण्यापासून वाचू शकता.

गेल्या काही महिन्यांपासून SBI बँकेच्या ग्राहकांना SBI Customers Alert स्वरूपाचा एक मॅसेज येत आहे .ज्यायोगे ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हि बातमी विशेष करून SBI ग्राहकांनी जाणून घ्यावी अन्यथा त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. जर तुम्ही SBI चे ग्राहक आहात. तुमचे एसबीआय बँकेत तुमचे खाते असेल, तर तुमच्यासाठी आम्ही अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत . गेल्या काही दिवसांपासून बहुतेक SBI बँकेच्या ग्राहकांना त्यांचे बँकखाते तापुरत्या स्वरूपात लॉक झाल्याचा मॅसेज येत आहे. SBI बँक अश्या प्रकारचा कुठलाच मॅसेज आपल्या कुठल्याच ग्राहकाला पाठवत नाही. हा मेसेज आर्थिक फसवणूक करणाऱ्या काही टोळ्यांकडून पाठवला जात आहे.

जर तुम्हालाही असाच मेसेज आला असेल, तर तुम्ही त्याला प्रतिसाद न देता त्याबद्दल बँकेत तक्रार करावी. सदर मॅसेज बाबत सरकारी अधिकृत फॅक्टर चेकर पीआयबी फॅक्टर चेकने एसबीआयच्या ग्राहकांना अशा संदेशांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

तुम्ही कुठे करू शकता तक्रार

पीआयबी फॅक्ट चेकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही SBI च्या ग्राहकांना एक संदेश पाठवला जात आहे, ज्यामध्ये तुमचे खाते तात्पुरत्या स्वरूपात लॉक करण्यासंदर्भात माहिती दिली जाते. पीआयबीने म्हटले आहे की अशा संदेशांना किंवा ईमेलला कधीही उत्तर देऊ नका आणि आपली बँकिंग माहिती कुणालाही शेअर करू नका जर तुम्हाला अश्या प्रकारच्या फसवणुकी संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध झाली तर त्यावर प्रतिक्रिया न देता त्वरित [email protected] वर ती माहिती नमूद करावी.

कुठल्याही लिंकवर क्लीक करू नका.

scammer ने पाठवलेल्या कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका जर तुम्ही तसे केले तर तुमच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम क्षणार्धात शून्यावर येऊ शकते scammer तुमचा वैयक्तिक डेटा चोरून त्या द्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवू शकतो अशा परिस्थितीत बँकेसंदर्भात तुम्हाला आलेल्या कुठल्याही अज्ञात लिंकवर कधीही क्लिक करू नका. आपली वैयक्तिक माहिती कधीही अनोळखी ईमेल किंवा एसएमएस आणि व्हॉट्स अँपवर शेअर करू नका. त्यासंदर्भात कुठलाही मॅसेज आल्यास [email protected] ह्या ईमेलवर सदर मॅसेजची माहिती द्या.वा 1930 ह्या टोल फ्री क्रमांकावरही तुम्ही कॉल करू शकता.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना सूचित करताना म्हटले आहे की, बँक कधीही कोणत्याही ग्राहकाची वैयक्तिक माहिती विचारत नाही. ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती जसे की खाते क्रमांक, पासवर्ड आणि संवेदनशील माहिती टेक्स्ट मेसेजद्वारे कधीही कुणाला देऊ नये. फसवणुकी बाबतचा कोणताही मेसेज आल्यास त्याची खातरजमा करावी आणि मगच पुढचे पाऊल उचलावे.