SBI Alert : ग्राहकांनी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावे ‘हे’ काम अन्यथा बँकिंग सर्व्हिस बंद केली जाईल

नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये बँकेने आपल्या खातेदारांना 31 मार्च 2022 पूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची नोटीस दिली आहे. या कालावधीपर्यंत हे काम न करणाऱ्या ग्राहकांची बँकिंग सर्व्हिस बंद केली जाऊ शकते, असे बँकेने म्हटले आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकेल .

आयकर नियमांनुसार आता आधार कार्डसोबत पॅन लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याने आपला पॅन आधारशी लिंक केला नसेल तर त्याचे पॅन कार्ड इनव्हॅलिड होईल.

पॅन कार्ड लवकरच आधारशी लिंक करा
SBI ने आपल्या ग्राहकांना या मोठ्या गैरसोयीपासून वाचवण्यासाठी अलर्ट जारी केला असून, लवकरात लवकर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करा. अन्यथा, इनव्हॅलिड पॅन कार्डमुळे बँक तुमची बँकिंग सर्व्हिस बंद केली जाईल. त्यामुळे 31 मार्चपूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

सरकारने मुदत वाढवली आहे
वास्तविक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2021 होती. मात्र लोकांच्या सोयीसाठी, सरकारने ती नंतर 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली. म्हणजेच या कालावधीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमच्या बँकिंग सर्व्हिस बंद होतील. जर तुम्ही अद्याप पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर पॅन कार्ड आणि आधार कसे लिंक करायचे ते जाणून घ्या.

अशा प्रकारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता

पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्स वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर क्लिक करा.

येथे तुम्हाला Link Aadhaar चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

पुढील पेजवर, आधार कार्डमध्ये एंटर केल्याप्रमाणे तुमचे नाव भरावे लागेल.

जर तुमच्या आधारमध्ये फक्त जन्म वर्ष टाकले असेल तर आधार कार्ड पर्यायामध्ये माझ्याकडे फक्त बर्थ ईअर निवडा.

त्यानंतर कॅप्चा कोड टाकून रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP एंटर करा.

यानंतर, तुम्ही सबमिट करताच तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले जाईल.

यानंतर, तुम्ही तुमच्या SBI बँकिंग सर्व्हिसचा लाभ आणखी सहजतेने घेऊ शकता.

दुसरा मार्ग

तुम्ही SMS द्वारे देखील पॅन आणि आधार लिंक देखील करू शकता.

यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDPAN<12-अंकी आधार><10-अंकी पॅन> टाइप करा.

हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. यासोबत तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.