शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे ‘हे’ महत्त्वाचे काम अन्यथा पैसे मिळू शकणार नाहीत

नवी दिल्ली I प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता ट्रान्सफर करू शकते. मात्र, पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्यात हे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील जे eKYC करतील. जे शेतकरी ही अट पूर्ण करणार नाहीत, त्यांना पैसे मिळणार नाहीत.

आतापर्यंत 10 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. 10वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आला. यामध्ये 10.09 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,900 कोटी रुपये जमा करण्यात आले.

eKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे
भारत सरकारने फार पूर्वीपासूनच सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य केले होते. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा एकदा ते आवश्यक करण्यात आले आहे. घरबसल्या तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनेही हे महत्त्वाचे काम सहज पूर्ण करता येते.

रेशनकार्डही अनिवार्य झाले
सरकारने केलेल्या मोठ्या बदलांनुसार, आता या योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन करताना रेशन कार्ड क्रमांक देणे देखील बंधनकारक असेल. याशिवाय डॉक्युमेंट्सची पीडीएफ कॉपीही ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागेल. नवीन रजिस्ट्रेशन करताना सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि डिक्लेरेशन लेटरच्या हार्ड कॉपी जमा करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

अशाप्रकारे eKYC पूर्ण करा
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
आता किसान कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
त्यानंतर येथे विचारलेली आवश्यक माहिती एंटर करा.
यानंतर सबमिट वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण होईल.