SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : दोन वर्षापूर्वी पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात चांगलाच हाहाकार माजवला होता. या कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेक लोकांचे चालू असलेले व्यवसाय ठप्प झाले. जर आपल्यालाही कोरोनामुळे व्यवसाय अथवा नोकरी गमवावी लागली असेल तर ही बातमी आल्याची महत्वाची आहे. कारण आता SBI कडून आपल्याला घरबसल्या 90 हजार रुपये कमवण्याची संधी मिळत ​​आहे.

SBI ATM PIN Generation through SBI ATM live...at ATM - YouTube

होय, SBI ची ATM फ्रँचायझी घेऊन आपल्याला असे करता येईल. मात्र त्याआधी हे लक्षात घ्या कि, कोणत्याही बँकेद्वारे कधीही एटीएम इन्स्टॉल केले जात नाही. हे काम एका स्वतंत्र कंपनीकडून केले जाते. त्यासाठी बँकेकडून संबंधित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. मात्र यासाठी काही अटी असतील…

SBI ATM फ्रँचायझी घेण्याच्या अटी

यासाठी 50-80 चौरस फूट जागा लागेल.
तसेच इतर ATM पासून आपल्या ठिकाणाचे अंतर 100 मीटर असावे.
तळमजला आणि चांगली दिसणारी जागा आवश्यक असेल.
तसेच 24 तास वीज उपलब्ध असावी.
1 किलोवॅट वीज कनेक्शन आवश्यक असेल.
300 ट्रान्सझॅक्शन क्षमता असलेली जागा आवश्यक असेल.
ATM च्या जागेवर काँक्रीटचे छत असावे.
सोसायटी किंवा संबंधित अथॉरिटीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल.

SBI Strengthens Security System On ATM Withdrawals

एसबीआय ATM फ्रँचायझी घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

ओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा – रेशन कार्ड, वीज बिल
बँक खाते आणि पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर

SBI ATM फ्रँचायझीसाठी अशा प्रकारे करा अर्ज

यासाठी सर्वांत आधी SBI ATM साठी कोणती कंपनी फ्रँचायझी देते याची सविस्तरपणे माहिती जाणून घ्यावी लागेल. इथे हे लक्षात घ्या की, मुथूट एटीएम, टाटा इंडिकॅश आणि इंडिया वन एटीएम सारख्या कंपन्या ATM इन्स्टॉल करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतात. जर आपल्यालाही ATM घ्यायचे असेल तर संबंधित कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ऑनलाइन लॉग इन करून एटीएमसाठी अर्ज करा.

‘या’ कंपन्यांची वेबसाईट खालील प्रमाणे आहे

टाटा इंडिकॅशची http://www.indicash.co.in ,
मुथूट एटीएमची http://www.muthootatm.com/suggest-atm.html ,
इंडिया वन एटीएम – http://india1atm.in/rent-your-spaceअधिकृत वेबसाइट.

How To Generate SBI ATM Card Pin Through SMS

SBI ATM फ्रँचायझीद्वारे किती कमाई होईल ???

हे लक्षात घ्या कि, टाटा इंडिकॅश ही फ्रँचायझी देणारी सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाखांच्या सिक्योरिटी डिपॉझिट्सवर फ्रँचायझी देते. तसेच ही रक्कम परत देखील केली जाते. याशिवाय वर्किंग कॅपिटल म्हणून 3 लाख रुपयेही जमा करावे लागतील. अशा प्रकारे, यामध्ये आपली एकूण 5 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. आता त्याद्वारे केलेल्या प्रत्येक कॅश ट्रान्सझॅक्शन वर 8 रुपये तर नॉन-कॅश ट्रान्सझॅक्शनवर 2 रुपये मिळतात. म्हणजेच, आपल्या गुंतवणुकीवरील वार्षिक आधारावर 33-50% पर्यंत रिटर्न मिळेल.

चला तर मग एका उदाहरणाद्वारे हे समजून घेउयात… समजा एका आपल्या एटीएमद्वारे दररोज 250 ट्रान्सझॅक्शन झाले. ज्यामध्ये 65 टक्के कॅश आणि 35 टक्के नॉन-कॅश ट्रान्सझॅक्शन असतील, तर आपले मासिक उत्पन्न 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल. त्याच वेळी, 500 ट्रान्सझॅक्शनवर सुमारे 80-90 हजार रुपये कमिशन म्हणून मिळतील.

हे पण वाचा :

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे नवीन दर पहा

Multibagger Stock : गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल

HDFC Bank च्या ग्राहकांना धक्का !!! बँकेने आजपासून लागू केला हा नवा नियम

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!

BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने ‘या’ 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल

Leave a Comment