हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : देशातील सरकारी बँकांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. जर आपण सध्याच्या सणासुदीच्या काळात पर्सनल लोन, कार लोन किंवा गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल तर बँकेकडून आपल्यासाठी काही ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला झिरो प्रोसेसिंग फीस आणि आकर्षक व्याजदरावर एसबीआय कडून कर्ज घेता येईल.
Celebrate this festive season with SBI and rejoice together with your loved ones. Get exclusive offers like Zero Processing fees, Attractive Interest Rates, and more on Car, Personal and Gold Loans.
Apply now on YONO SBI app or visit https://t.co/rtjaIeXXcF#KhushiyonKiTaiyaari pic.twitter.com/UBfpOj0M3f— State Bank of India (@TheOfficialSBI) October 6, 2022
बँकेकडून नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या ऑफरबद्दल ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये म्हटले गेले कि, “हा सणाचा हंगाम एसबीआय सोबत साजरा करा आणि आपल्या प्रियजनांसोबत आनंद घ्या. झिरो प्रोसेसिंग फीस, आकर्षक व्याजदर, कार, पर्सनल आणि गोल्ड लोन यांसारख्या स्पेशल ऑफरचा लाभ घ्या, आता YONO SBI App वर अर्ज करा किंवा bank.sbi ला भेट द्या.”
या ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील जोडला गेला आहे ज्यामध्ये बँकेने म्हटले आहे की, “या सणासाठी काही लोकं अनेक आनंदाने तयारी करतात. काही जण नवीन कारसाठी तर काही जण प्रवासाठी. तसेच काही जण जुन्या घराचे नूतनीकरण करून आनंद साजरा करतील. या शुभ सणासाठी, आपणही आनंदाने तयारी करावी. लक्षात ठेवा, फक्त SBI सोबतच करा आनंदाची तयारी.”
28 ऑक्टोबर 2022 पर्यंत व्हॅलिड असेल उत्सव डिपॉझिट स्कीम
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एसबीआय कडून उत्सव डिपॉझिट ही खास योजना लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 75 दिवसांसाठी पैसे जमा करून या स्पेशल FD योजनेचा लाभ घेता येईल. मात्र लक्षात ठेवा कि, 28 ऑक्टोबर 2022 पर्यंतच ही ऑफर सुरु असेल. यामध्ये डिपॉझिटचा कालावधी 1000 दिवसांचा आहे. या योजनेसाठी एसबीआय कडून 1,000 दिवसांच्या डिपॉझिटवर वार्षिक 6.10 टक्के व्याजदर मिळत आहे. तसेच यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.sbi.co.in/documents/136/1364568/220822-UTSAV+DEPOSIT.pdf
हे पण वाचा :
‘या’ 5 Multibagger Stocks ने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मिळवून दिला मोठा नफा
PNB च्या ‘या’ स्पेशल ऑफर अंर्तगत ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 6.60% रिटर्न !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर तपासा
WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!
IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी