हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपीक पदासाठी 5000 हुन अधिक जागांची भरती सुटली आहे. यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईवर https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जातील. 27 सप्टेंबर 2022 हि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागा आहेत. महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, भोपाळ, बंगाल, केरळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, जयपूर, लखनौ/दिल्ली, आणि उत्तर पूर्व येथे लिपिक पदासाठी भरती केली जाईल. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. यानंतर लखनौ आणि भोपाळमध्ये सर्वाधिक जागा आहेत.
बँक– स्टेट बँक ऑफ इंडिया
भरली जाणारी पद– क्लार्क ( जुनिअर असोसिएट )
पदसंख्या– 5008
महाराष्ट्र मधील जागा- 797
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष
अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 सप्टेंबर 2022
अर्ज संपण्याची शेवटची तारीख- 27 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया –
SBI क्लर्क 2022 साठी निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश आहे.
टप्पा क्र. 1 पूर्वपरीक्षा (Prelims Exam)
टप्पा क्र. 2- मुख्य परीक्षा (Mains Exam)
असे असेल SBI क्लर्क 2022 परीक्षेचे वेळापत्रक –
SBI क्लर्क 2022 अधिसूचना 06 सप्टेंबर 2022
SBI क्लर्क ऑनलाइन अर्ज सुरु – 07 सप्टेंबर 2022
SBI क्लर्क ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022
पूर्व परीक्षा प्रशिक्षण तारखा
प्राथमिक परीक्षेसाठी कॉल लेटर –
SBI क्लर्क परीक्षेची तारीख 2022 (प्राथमिक) नोव्हेंबर 2022
SBI क्लर्क परीक्षेची तारीख 2022 (मुख्य) डिसेंबर / नोव्हेंबर 2022
SBI लिपिक भरती 2022 साठी आवश्यक पात्रता
SBI लिपिक भरती 2022 साठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
उमेदवार 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेले असावेत.
जे विद्यार्थी अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात.
त्यांची निवड झाल्यास, त्यांना 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
अर्ज शुल्क फी-
SBI परीक्षेसाठी अर्ज शुल्क रु.750/- सामान्य श्रेणीसाठी आणि SC/ST/OBC/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी शून्य. एकदा भरलेले शुल्क/ सूचना शुल्क कोणत्याही खात्यावर परत केले जाणार नाही किंवा ते इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाहीत. अर्जाची की ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन-
कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) Rs.17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550 1730/7-42600-3270/1-45930-1990/1-47920.
The starting Basic Pay is Rs.19900/- (Rs.17900/- plus two advance increments admissible to graduates)
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकला भेट द्यावी.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी सर्व सामान्य माहिती आणि क्रेडेन्शियल (लॉगिन ID आणि पासवर्ड) भरा.
5. तुमच्या माहितीचे एकदा व्हेरिफिकेशन करा आणि शेवटी सबमिट करा.
6. आपण सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला SBI क्लर्क
2022 साठी अर्ज शुल्क भरावे लागेल.
7. अर्ज फी भरल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.
8. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरकन्फर्मेशनचा मेल किंवा SMS प्राप्त होईल.
9. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.
10. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
11. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY
अधिकृत वेबसाईट sbi.co.in: