हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक आता शेतकर्यांना सुलभ अटींवर कर्ज देण्यासाठी एक नवीन लोन प्रोडक्ट (New Loan Product) सुरू करण्याचा विचार करीत आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘सफल’ (SAFAL) या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या या लोन प्रोडक्ट ‘सफल’ (SAFAL) अंतर्गत आतापर्यंत कधीच कर्ज न घेतलेल्या (NO Credit History) ऑर्गेनिक कॉटन प्रोड्यूसर्स (Organic Cotton Growers) ना कर्ज सोप्या अटींवर दिले जाईल.
एसबीआय आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा जोरदारपणे वापर करत आहे
फिक्की (FICCI) च्या फिन्टेक कॉन्फरन्समध्ये एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक सीएस सेट्टी म्हणाले की, देशातील सर्वात मोठा कर्जदाता व्यवसाय तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Al) आणि मशीन लर्निंग (ML) मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. आमच्या रिटेल सेगमेंट (Retail Segment) मधून बाहेर जाऊन आम्ही शेतकऱ्यां पर्यंत पोहोचू इच्छित आहोत. यावेळी, आम्ही फक्त पीक कर्जच (Crop Loans) देत नाही आहोत, तर लवकरच सेफ एंड फास्ट एग्रीकल्चर लोन (SAFAL) सुरू करणार आहोत.
लॉकडाऊन दरम्यान स्टेट बँकेने 17 लाख प्री-अप्रूव्ड लोनचे वितरण केले
सेट्टी म्हणाले की, एक कंपनी सेंद्रिय कापूस उत्पादकांचा डेटाबेस तयार करेल. ते म्हणाले, ‘या डेटाबेसच्या सहाय्याने जगातील कोणत्याही खरेदीदाराला सहजपणे हे कळू शकेल की, शेतकरी खरोखरच सेंद्रिय कापूस उत्पादित करीत आहे की नाही. आम्ही कापूस उत्पादकांचा डेटा घेऊ आणि त्यांच्याकडे पत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पत सुविधा उपलब्ध करुन देऊ. ते म्हणाले की, कापूस उत्पादकांना पीक कर्ज दिले जात नाही, परंतु आता आम्ही त्यांना ही सुविधा देऊ. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचे उदाहरण देत सेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान बँकेने 17 लाख प्री-अप्रूव्ड लोनचे वितरण केले आहे.
‘एसबीआय डेटा एनालिटिक्सचा पूर्ण ताकतीने वापर करीत आहे’
एसबीआयचे एमडी पुढे म्हणाले की, डेटा एनालिटिक्सचा बँकेने पूर्ण ताकतीने उपयोग केला आहे. बँकेचा एआय-एमएल विभाग प्रयोग म्हणून सुरू केलेला विभाग नाही. या विभागामुळे बँकेचा भरपूर व्यवसाय झाला आहे. गेल्या दोन दिवसांत आपण 1,100 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. सध्या बँकेत 40 मशीन लर्निंग आधारित मॉडेल आहेत. त्यांचा वापर व्यवसाय वाढविण्यासाठी, जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी केला जात आहे. बँकिंग उद्योगात सध्या एसबीआयची सर्वाधिक क्षमता असल्याचे त्यांनी दावा केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”