नवी दिल्ली । आजही गुंतवणूकीविषयी बोलताना अनेक लोकं एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटची (Fixed Deposit) शिफारस करतात. गुंतवणूकीच्या बाबतीत एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, ज्यामध्ये परताव्याची हमी दिलेली असते. यामध्ये सेव्हिंग अकाउंटपेक्षा (Saving Account) तुम्हाला जास्त परतावा मिळतो. बँकांव्यतिरिक्त आपण पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये देखील एफडी घेऊ शकता, ज्यास पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Time Deposits) असे म्हणतात. बँकांमध्ये आपण 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडी करू शकता, त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंतचा पर्याय मिळेल.
एसबीआयच्या एफडीवरील व्याज दर
एसबीआयच्या एफडीवरील नवीन व्याजदर 8 जानेवारीपासून लागू झाले आहेत. त्यानुसार बँक 7 दिवस ते 45 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या एफडी वर ग्राहकांना 2.9% व्याज देत आहे. त्याचबरोबर, 46 ते 179 दिवसांमध्ये मॅच्युर होणाऱ्या एफडीवर 3.9%, 180 ते 210 दिवसांमध्ये मॅच्युर होणाऱ्या एफडीवर 4.4% आणि 211 दिवसात मॅच्युर होणाऱ्या एफडीवर 4.4% व्याज मिळणार आहे.
एसबीआय 1 वर्ष ते 2 वर्ष या कालावधीतील एफडीवर 5% व्याज देते, 2 वर्ष ते 3 वर्षांदरम्यानच्या एफडीवर 5.10% आणि 3 वर्ष ते 5 वर्षाच्या मध्यम मुदतीच्या एफडीवर 5.30% व्याज देते. त्याचबरोबर, दीर्घ मुदतीच्या 5 वर्ष ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.40% दराने व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सर्व एफडीवर बँक 50 बेसिस पॉईंट्स जास्त देते.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट वरील व्याज दर
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये आपण 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकता. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर दिलेले नवीन व्याज दर 1 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. पोस्ट ऑफिस 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षांच्या डिपॉझिटवर 5.5% व्याज देते. तथापि, 5 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर ठेवीदारांना 6.7% व्याज मिळते. अर्थात, जर आपण 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत फिक्स्ड डिपॉझिट ठेवत असाल तर आपल्याला पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटवर अधिक व्याज मिळेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.