नवी दिल्ली । सध्याच्या दिवसात कोरोना झपाट्याने वाढत आहे, जर आपण देखील कोरोनाग्रस्त असाल आणि उपचारांच्या खर्चाबद्दल काळजीत असाल तर टेन्शन अजिबात घेऊ नका. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआय (State Bank of India) तुमच्या कोरोना खर्चासाठी एक खास योजना घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 156 रुपयात त्याचा लाभ घेऊ शकता. बँकेच्या या योजनेचे नाव कोरोना रक्षक पॉलिसी आहे. चला तर मग याविषयी सविस्तरपणे जाणून घेउयात-
SBI कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल महत्वाच्या गोष्टी-
>> SBI कोरोना रक्षक पॉलिसी ही आरोग्य विमा संरक्षण योजना आहे.
>> स्टेट बँक ऑफ इंडिया कोविड पॉलिसी कोणत्याही वैद्यकीय चाचणीशिवाय जारी केली जाते.
>> इथे तुम्हाला 100 टक्के कव्हर मिळेल.
>> कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यासाठीचे किमान वय 18 वर्षे आहे.
>> कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये किमान 156 रुपये आणि कमाल 2,230 रुपये प्रीमियम भरता येऊ शकतात.
>> स्टेट बँकेच्या कोरोना रक्षक पॉलिसीचा कालावधी 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवस आहे.
>> पॉलिसीमध्ये किमान 50 हजार आणि जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
>> 50 हजार रुपयांचे कव्हर मिळविण्यासाठी 157 रुपये द्यावे लागतात.
>> कोरोना पॉलिसीबद्दलच्या अधिक माहितीसाठी ग्राहक 022-27599908 वर एक मिस्ड कॉल देऊ शकतात.
>> SBI कोरोना रक्षक पॉलिसीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सिंगल प्रीमियम श्रेणीमध्ये दिले गेले आहे.
या अधिकृत लिंकवरुन अधिक माहिती मिळवा
या पॉलिसीबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/corona-rakshak या लिंकवर भेट देऊ शकता.
24 तासांत 1.84 लाख प्रकरणे
देशातील एका बाजूला, जिथे कोरोना रूग्णांचा आलेख वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर कोविड (Covid-19) मुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1.84 लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1000 हून अधिक लोकं मरण पावले आहेत. भारतातील कोरोनाची ऍक्टिव्ह प्रकरणे आता 13 लाखांच्या पुढे गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून, दररोज दीड लाखांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे देशात येत आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा